कोल्हापूर जिल्ह्यातील १२ बंधारे पाण्याखाली

राधानगरीतून २८२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग

कोल्हापूर : जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. राधानगरी धरणात सुमारे ८.३० टीएमसी म्हणजेच ९९ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक ३ खुला असून धरणातून एकूण २८२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

आज सकाळी ७ वाजताच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून १४२८ क्युसेक, तर पावर हाऊसमधून १४०० क्युसेक असा एकूण २८२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने एकूण १२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि शिरोळ; कासारी नदीवरील यवलूज; भोगावती नदीवरील सरकारी कोगे, खडक कोगे आणि हळदी; तसेच दूधगंगा नदीवरील सुळकूड हे बंधारे पाण्याखाली आहेत.

प्रमुख धरणांमध्ये मोठा पाणीसाठा

जिल्ह्यातील बहुतांश धरणे ९० टक्क्यांहून अधिक भरली असून काही धरणे शंभर टक्के क्षमतेने भरली आहेत. धरणनिहाय पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे :

* राधानगरी – ८.३० टीएमसी (९९ टक्के)
* तुळशी – ३.४२ टीएमसी (९९ टक्के)
* वारणा – ३२.२६ टीएमसी (९४ टक्के)
* दूधगंगा – २४.३६ टीएमसी (९६ टक्के)
* कासारी – २.५९ टीएमसी (९३ टक्के)
* कडवी – २.५२ टीएमसी (१०० टक्के)
* कुंभी – २.६० टीएमसी (९६ टक्के)
* पाटगाव – ३.४९ टीएमसी (९४ टक्के)
* चिकोत्रा – १.२४ टीएमसी (८१ टक्के)
* चित्री – १.८९ टीएमसी (१०० टक्के)
* जंगमहट्टी – १.२२ टीएमसी (१०० टक्के)
* घटप्रभा – १.५६ टीएमसी (१०० टक्के)
* जांबरे – ०.८२ टीएमसी (१०० टक्के)
* आंबेआहोळ – १.२४ टीएमसी (१०० टक्के)
* सर्फनाला – ०.६७ टीएमसी (१०० टक्के)
* धामणी – १.२९ टीएमसी (१०० टक्के)
* कोदे लघुपाटबंधारे – ०.२१ टीएमसी (१०० टक्के)

बंधाऱ्यांची पाणीपातळी वाढली
जिल्ह्यातील बंधाऱ्यांच्या पाणीपातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी २१ फूट, सुर्वे २०.१० फूट, रुई ५० फूट, इचलकरंजी ४७.११ फूट, तेरवाड ४४ फूट, शिरोळ ३६ फूट, तर नृसिंहवाडी येथे ३४ फूट पाणीपातळी नोंदविण्यात आली आहे.

आणखी वाचा

error: Content is protected !!