वन्य प्राण्याच्या भीतीने सतत दबावाखाली राहण्यापेक्षा सतर्क राहून स्वसंरक्षण करूया: विराज नाईक

टाकवे : वन्य प्राण्याच्या भीतीने सतत दबावाखाली राहण्यापेक्षा सतर्क राहून स्वसंरक्षण करुया. त्याचसाठी ‘शिवम्‌ शौर्य’ अभियानाच्या माध्यमातून वन्य प्राण्यांपासून सुरक्षिततेची नवी दिशा देण्याचे काम मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान आणि शिराळा वन विभागामार्फत सुरू आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांनी केले. टाकवे येथील टाकवे हायस्कूलमध्ये मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान व

६ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना ५,०८६ कोटींची कर्जमुक्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील लाभाचे ऑनलाइन वितरण मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ६ लाख ३६ हजार ३६ पात्र शेतकऱ्यांना ५ हजार ८६ कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथून थेट ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आला. या योजनेच्या अंमलबजावणीअंतर्गत आतापर्यंत १२ लाख ५८ हजार २४३ शेतकऱ्यांना एकूण १० हजार ११५ कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांना लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असून, लाभार्थींची संख्या सातत्याने अद्ययावत होत आहे. आतापर्यंत १३ लाख ७० हजार कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक लाभ छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकऱ्यांना मिळाला. या विभागातील ३ लाख २ हजार २७३ शेतकऱ्यांना २ हजार २८४ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला. अमरावती विभागातील १ लाख ४५ हजार ८०८ शेतकऱ्यांना १ हजार

error: Content is protected !!