व्हॉलीबॉलमध्ये मॉडर्न हायस्कूल वाळवा तालुक्यात प्रथम

१४ वर्षांखालील मुलांच्या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

ईश्वरपूर : आष्टा येथे झालेल्या तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत साखराळे येथील मॉडर्न हायस्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. अंतिम सामन्यात मॉडर्न हायस्कूलच्या संघाने वशी हायस्कूलचा सलग दोन सेटमध्ये पराभव करीत विजेतेपद मिळविले. या विजयामुळे मॉडर्न हायस्कूलच्या संघाची पलूस येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

यश शिंदे, अतिश पाटोळे, श्री महापुरे, अश्विक सोनवणे, ओमकार सुर्वे, श्रीकांत भडके, आर्यन लोहार, श्रीयोग पवार, ओमकार कुंभार आणि संस्कार गुडगे यांनी अष्टपैलू व सांघिक खेळाचे प्रदर्शन करीत स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.

मॉडर्न हायस्कूलचे मुख्याध्यापक जयसिंग कदम, क्रीडा शिक्षक संजय पाटील, मिलिंद जाधव तसेच जयंत स्पोर्ट्सचे अध्यक्ष प्रकाश शेळके, जीवन पवार, महेश पाटील, भैय्या पवार, संतोष कुंभार, अधिक पाटील आणि योगेश डांगे यांचे विजेत्या संघाला मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. संघाच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

आणखी वाचा

error: Content is protected !!