एसटीचा ‘आवडेल तेथे प्रवास’ पास आता ऑनलाइन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेतील ४ व ७ दिवसांचे पास आता ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना पास काढण्यासाठी आगारात जाऊन हस्तलिखित पद्धतीने अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही.

एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार ४ व ७ दिवसांच्या पाससाठी ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ तसेच मोबाईल ॲप्लिकेशनवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झालेला पास प्रिंट स्वरूपात किंवा मोबाईलमधील पीडीएफ स्वरूपात प्रवासावेळी दाखवता येणार आहे. या ऑनलाइन पासवर क्यूआर कोड देण्यात येणार असून, प्रवासाच्या वेळी वाहकाकडून तो स्कॅन करण्यात येईल. त्यामुळे पास काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेळेची बचत करणारी ठरणार आहे.

या सुविधेमुळे राज्यभर एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेचा लाभ घेणे अधिक सोपे होणार आहे.

आणखी वाचा

error: Content is protected !!