कवठेपिरान, समडोळी येथे राजारामबापू समृद्ध भूमी शेतकरी संवाद दौरा
ईश्वरपूर : सध्या क्षारपड होत चाललेल्या,नापीक होत चाललेल्या जमिनी हा शेतकऱ्यांच्या समोरचा मोठा गंभीर प्रश्न आहे. आपण एकमेकांच्या हातात- हात घालून क्षारपड जमिनींची सुधारणा करण्यासाठी कायमचा उपाय काढूया,असा विश्वास राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी कवठेपिरान येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केला.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कवठेपिरान, समडोळी येथे राजारामबापू समृद्ध भूमी शेतकरी संवाद दौरा करण्यात आला. याप्रसंगी शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील,जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदिपकुमार पाटील,संचालक रमेश हाके,रघुनाथ जाधव,युवा उद्योजक सचिन पाटील,पं.स.सदस्य अरविंद संपकाळ, माजी सभापती दत्तात्रय पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे संचालक संजय पाटील,सोसायटीचे माजी अध्यक्ष राजेंद्र तामगावे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले.
प्रतिक पाटील म्हणाले, सध्या वाळवा तालुका असो,अथवा मिरज तालुका असो, आपल्या जमिनी मोठया प्रमाणात क्षारपड,नापीक होत चालल्या आहेत. आता आपणास शांत बसता येणार नाही. आपण एकमेकांच्या हातात-हात घालून या प्रश्नांवर कायमचा उपाय काढूया. आपण राजारामबापू समृद्ध भूमी अभियान मध्ये सहभागी व्हा,आपण क्षारपड जमिनीवर निश्चित उपाय काढू शकतो.
सचिन पाटील म्हणाले, माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी आमच्या गावास क्षारपड जमीन सुधारण्याचा ३८ कोटी रुपयांचा प्रकल्प दिला होता. मात्र दुर्दैवाने तो पूर्ण होऊ शकला नाही. आ. जयंतराव पाटील यांनी आमच्या गावाच्या विकासात मोलाचे योगदान दिलेले आहे.
यावेळी कारखान्याचे जलसिंचन अधिकारी जे. बी.पाटील, ऊस विकास अधिकारी विवेक पुजारी यांनी कारखान्याच्या योजनांची सविस्तर माहिती दिली. राजेंद्र तामगावे, ज्ञानेश्वर पाटील, आरमान तामगावे, पिराजी पाटील, सागर थोरात, योगेश पाटील या शेतकऱ्यांनी काही सूचना केल्या.
प्रारंभी प्रताप गुरव यांनी स्वागत केले,तर विनोद वडगावे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी श्रीकांत बोधले, प्रकाश सावर्डे, रंगराव पाटील, शंकर सावंत, बाळासाहेब देसाई, जगन्नाथ मगदूम, रमेश पाटील,बाबासो म्हाबरी,बाळासो खिचडे, अरुण पाटील, तानाजी पाटील यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. पं.स.सदस्य अरविंद सपकाळ यांनी आभार मानले.










