मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचाच्या वतीने शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘अध्ययन-अध्यापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) सजग वापर : माझा अनुभव’ हा या स्पर्धेचा मुख्य विषय आहे.
शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी आणि जाणीवपूर्वक वापर करणाऱ्या शिक्षकांना आपले अनुभव, प्रयोग आणि उपक्रम मांडण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची संधी ठरणार आहे.
स्पर्धेसाठी रविवार, दि. ६ सप्टेंबर पासून नावनोंदणी सुरू झाली असून रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नावनोंदणी करता येणार आहे. इच्छुक शिक्षकांनी पोस्टरवर दिलेला QR कोड स्कॅन करून ऑनलाइन नोंदणी करावी.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी ८२९१४ १६२१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.











