मांगले : शिराळा तालुक्यातील मांगले येथील धनटेक पाणीपुरवठा संस्थेच्या वारणा नदीपात्रातील जॅकवेलचे पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. तसेच पाणी योजनेला वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत डी.पी.चेही नुकसान झाले होते. नदीपात्रातील पाणीपातळी कमी होताच संस्थेने जॅकवेल दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
या दुरुस्तीच्या कामाची जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांनी पाहणी करून कामाची माहिती घेतली. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत त्यांनी संबंधितांशी चर्चा केली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष सत्यम पाटील, बाळू चरापले, उपसरपंच सागर गंगधर, अक्षय पाटील, रणजीत चरापले, नितीन चरापले, अवधूत चरापले, पिंटू कुंभार, आनंदराव कांबळे, अशोक दशवंत, सचिव अशोक चरापले आदी उपस्थित होते.










