राहुल महाडीक यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम

सांज सोबती सेवाश्रमास धान्य देणगी

पेठ: सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे सचिव तथा व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राहुल महाडीक यांच्या वाढदिवसानिमित्त हार-तुरे व अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला. व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूलच्या प्राचार्या, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने पेठ येथील सांज सोबती सेवाश्रमास धान्य देणगी देण्यात आली.

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त हार-तुरे, जाहिरातबाजी अथवा अनावश्यक खर्च न करता गरजू घटकांसाठी सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन राहुल महाडीक यांनी केले होते. त्यानुसार व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. हर्षदा महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी सौ. हर्षदा महाडीक यांनी सांज सोबती सेवालयामुळे परिसरातील निराधार व वृद्ध नागरिकांना मोठा आधार मिळत असल्याचे सांगितले. वृद्धांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी चंद्रकांत कांबळे बापू यांचे कौतुक केले. तसेच सांज सोबती सेवालयाच्या कार्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही दिली.

दुष्काळाच्या काळात गरजू व निराधार नागरिकांना आधार देण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता आहे. वाढदिवसाचा खर्च सामाजिक कार्यासाठी वापरण्याचा हा उपक्रम समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करणारा ठरला.

यावेळी व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूलच्या प्राचार्या सौ. अलकनंदा शिंदे, जयदीप कदम, विद्यार्थी प्रतिनिधी मनाली कीर्तने, सानवी माने, लावण्या थोरात, सृष्टी खोत, श्रुती चव्हाण, श्रावणी बाबर, अक्षरा पवार, ईश्वरी देसाई, वरद कदम यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

आणखी वाचा

error: Content is protected !!