वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
कोल्हापूर : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. गोव्यात वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आज पार्थिव महाराष्ट्रात घेऊन येणार. नाना यांच्या निधनाने मनोरंजन आणि सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
मराठी रंगभूमीसोबतच बॉलिवूडमध्ये देखील त्यांनी आपली छाप सोडली. ‘परिंदा’, ‘सलाम बॉम्बे’ यांसारख्या अजरामर चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या महान कलाकाराच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
डोना पावला येथील निवासस्थानी घडली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर हे गोव्यातील डोना पावला येथील आपल्या निवासस्थानी अचानक अस्वस्थ होऊन खाली कोसळले आणि बेशुद्ध झाले. कुटुंबातील सदस्यांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अखेर गुरुवारी सकाळी 5:20 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.









