जि. प. सदस्य विराज नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा संपन्न
चिखली : येथील विश्वासराव नाईक सह. साखर कारखान्याच्या ‘विश्वास’ गणेशोत्सव मंडळामार्फत घेतलेल्या ‘विश्वास’, ‘विराज’ व फत्तेसिंगराव नाईक दूध संघ समूहातील कर्मचाऱ्यांच्या मॅरेथॉन स्पर्धेत विराज इंडस्ट्रीजच्या मयूर सुदर्शन पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला.
‘विश्वास’ कारखान्याचे संचालक व जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने ही मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत सुमारे दोनशेवर कर्मचारी सहभागी झाले. स्पर्धेचा शुभारंभ बिऊर येथील शेती गट कार्यालयाजवळ संचालक विराज नाईक यांच्या हस्ते झाला. कारखाना प्रवेशद्वारावर स्पर्धेचा शेवट झाला. यावेळी कार्यकारी संचालक अमोल पाटील, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, कामगार संघटना उपाध्यक्ष विजय पाटील, कारखाना व्यवस्थापक दीपक पाटील, सचिव सचिन पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख उपस्थित होते.
स्पर्धेतील दोन ते दहा क्रमांकाचे विजेते अनुक्रमे असे : प्रकाश पाटील, तानाजी पाटील, निशिकांत गोळे, दशरथ वरेकर (सर्व इंजिनिअरिंग विभाग), शशिकांत नाकील व रवींद्र खबाले (दोघे उत्पादन विभाग), संदीप पाटील (फत्तेसिंगराव नाईक दूध संघ), नारायण पाटील (डिस्टिलरी विभाग), संतोष पाटील (पर्यावरण विभाग).










