चिखलीच्या विश्वासराव नाईक कारखान्याची वार्षिक सभा २९ ऑगस्टला

कार्यकारी संचालक अमोल पाटील यांची माहिती

चिखली : शिराळा तालुक्यातील चिखली येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याची ५६ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार (ता. २९) रोजी दुपारी एक वाजता लोकनेते फत्तेसिंगराव नाईक लायन्स सेवा केंद्र, चिखली येथे होणार आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी दिली.

ते म्हणाले कारखान्याचे अध्यक्ष मा. मानसिंगराव फत्तेसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली खालील विषयांवर विचार विनिमय करण्यासाठी होणार आहे. यावेळी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-सरूडकर व संचालक उपस्थित असतील. विषयामध्ये सभेपुढील विषय असे आहेत. १) मागील दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजीचे वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे. २) संस्थेच्या कार्याचा सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल स्वीकारणे. ३) संस्थेची दिनांक ०१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ अखेरची जमाखर्च पत्रके (ताळेबंद व नफा-तोटा पत्रके) दाखल करून घेणे व स्वीकारणे. ४) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चाची व सन २०२७-२८ सालाकरिता मा. संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाची नोंद घेणे. तसेच सन २०२७-२८ सालाकरिता भांडवल उभारणीस मा. संचालक मंडळास अधिकार देणे.

५) कारखाना व्यवस्थापनाखाली कार्यरत असणाऱ्या फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्टच्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षांच्या हिशोब पत्रकास मंजुरी देणे. ६) मे. ए. डी. शिंदे अँड कंपनी, सांगली, सनदी लेखापाल यांचा सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल व त्यावरील मा. संचालक मंडळाने सादर केलेला दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारणे. ७) गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप झालेल्या उसास देण्यात आलेल्या अंतिम ऊस दरास मान्यता देणे. ८) सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्यासाठी लेखापरीक्षकांच्या नियुक्तीस मान्यता देणे. ९) कारखाना स्वमालकीचा सौर ऊर्जा प्रकल्प तसेच कारखान्यात तयार होणारे प्रेसमड व सांडपाण्यावर प्रक्रिया करुन १० मे. टन क्षमतेचा कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) प्रकल्प उभारणी करणेस मान्यता देणे. १०) मा. अध्यक्षांचे परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर विचारविनिमय करणे.

कार्यकारी संचालक श्री. पाटील म्हणाले, ही सभा फक्त सभासदांसाठी आहे. सभासदांनी सभेस उपस्थित राहणेसाठी कारखान्याकडून पाठविलेली प्रवेश पत्रिका तसेच ओळखपत्र सोबत आणावी, त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. सहकारी संस्थांनी सभेस हजर राहण्यासाठी प्रतिनिधी नियुक्तीच्या ठरावाची खरी नक्कल २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत कारखाना कार्यालयाकडे पाठवावी.

सभासदांना कारखान्याच्या कामकाजाबाबत काही धोरणात्मक सूचना करावयाच्या असल्यास त्यांनी दिनांक २५ ऑगस्ट२०२६ पर्यंत कारखान्याचे कार्यालयाकडे कार्यालयीन वेळेत लेखी पाठवावेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षांचा ताळेबंद व नफा तोटा पत्रके कारखान्याच्या नोटीस लावली आहेत.

आणखी वाचा

error: Content is protected !!