वाटेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने सभासदांना आधार दिला ; सोसायटीचा अमृत महोत्सवी सोहळा उत्साहात
वाटेगाव : सहकारी सोसायट्या ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाचा कणा आहेत. सहकारी संस्था एकमताने, पारदर्शकतेने आणि विश्वासाने चालवल्यास समाजामध्ये आर्थिक क्रांती घडू शकते. सहकारी संस्था स्थापन करण्याचे काम पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झाले. वाटेगाव सोसायटीचा ७५ वर्षाचा काळ सोपा नाही. सोसायटीने शेतकरी सभासदांना आधार दिला. कर्ज रूपाने मदत करून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीत मोठा हातभार लावला आहे. असे गौरवोद्गार आमदार जयंत पाटील यांनी काढले.
वाटेगाव (ता. वाळवा) येथील वाटेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक, जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक, जिल्हा परिषद सदस्या संध्याताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत, ही लोकनेते राजारामबापू पाटील यांची भूमिका होती. तीच भूमिका आम्ही पुढे घेऊन जात आहोत. सहकार क्षेत्रात विश्वासाला मोठे महत्त्व आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठेवीदारांनी बँकेवर विश्वास ठेवल्यामुळेच बँकेने सहा जिल्ह्यांमध्ये नफा कमावणारी आणि सुस्थितीत असलेली बँक म्हणून लौकिक मिळविला आहे. सोसायट्यांना कर्ज उपलब्ध करून देत शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्याचे काम जिल्हा बँक करत असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीमध्ये सहकारी संस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
आमदार जयंत पाटील
सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विराज नाईक,रणधीर नाईक, देवराज पाटील यांनी संस्थेच्या वाटाचालीबद्दल मनोगतात शुभेच्छा दिल्या.

यावेळी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, अभिजित पाटील, राहुल चव्हाण, सोसायटीचे अध्यक्ष किरण नांगरे, उपाध्यक्ष संदीप खोत, सरपंच नंदा चौगुले, उपसरपंच धनाजी इंगळे, माजी सभापती शुभांगी पाटील, रेठरे धरणचे सरपंच हर्षवर्धन पाटील, सचिव भगवान मोहिते, प्रदीप चव्हाण, श्रीकृष्ण नलवडे, संजीव बर्डे, बाबासाहेब हवलदार, संतोष करांडे यांच्यासह संचालक मंडळ, सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष किरण नांगरे यांनी केले. सूत्रसंचालन योगिता पाटील यांनी केले. आभार योगेश पाटील यांनी मानले.
प्रारंभी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडीक यांनी भेट देवून संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचे कौतुक आहे. संस्थेच्या पुढील प्रगतीसाठी आवश्यक ते सहकार्य व भरीव मदत निश्चितच केली जाईल. ग्रामीण भागातील शेतकरी व सभासदांच्या आर्थिक विकासासाठी सहकारी संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे.
राहुल महाडीक
संचालक
जिल्हा मध्यवर्ती बँक
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन किरण नांगरे,व्हा.चेअरमन संदीप खोत, संचालक उमेश गावडे, संभाजी खराडे,भगवान मोहिते,अरुण बर्डे, राहुल पाटील,समीर जाधव, विकास पाटील, विजय पाटील, अमोल पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते.










