सहकारी पतसंस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा : मानसिंगराव नाईक

बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे फत्तेसिंग पाटील सहकारी पतसंस्थेच्या शाखेचे उद्घाटन

बांबवडे : येथे फत्तेसिंग पाटील सहकारी पतसंस्था मर्यादित कोकरूडच्या बांबवडे (ता.शाहूवाडी) शाखेचा शुभारंभ झाला. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी फीत कापून शाखा कार्यालयाचे उद्घाटन केले. ‘विश्वास’ कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-दादा प्रमुख उपस्थित होते.

या निमित्ताने मानसिंगराव नाईक म्हणाले, सहकारी पतसंस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. शिराळा तालुक्यातील कोकरूड येथे स्थापन झालेल्या फत्तेसिंग पाटील सहकारी पतसंस्थेने टप्प्या टप्प्याने चांगली प्रगती साधली आहे. संस्थेच्या पाच शाखा आहेत. २ हजार ६०० सभासद आहे. संस्थेकडे २६ कोटीहून अधिकच्या ठेवी आहेत. कर्जवाटप २०.५० कोटी रुपयांची केले आहे. संस्थेचा नेट एन.पी.ए. शून्य टक्के व लेखापरीक्षणाचा ‘अ’ वर्ग आहे, ही सर्वात मोठी बाब आहे. यावरून संस्थेच्या आदर्शवत कारभाराची प्रचिती येते.

प्रारंभी पत संस्थेचे अध्यक्ष व ‘विश्वास’चे संचालक सुहास पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमा कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य अमरसिंह पाटील, पंचायत समिती सदस्य अभयसिंह चौगुले, पत संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश चिंचोलकर, सरपंच भगतसिंग चौगुले, उपसरपंच स्वप्नील घोडे-पाटील, माजी सरपंच जयसिंग पाटील, बाजार समितीचे माजी सभापती बाबासाहेब लाड, बाळू घोडे, म्हमुलाल सय्यद, ऋतुजा बलसाने, माजी उपसरपंच सुरेश नारकर, उद्योजक चंद्रप्रकाश पाटील, जयसिंग पाटील, दिलीप लाड, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब खुटाळे, उद्योजक शरद बावचकर, चरणचे माजी उपसरपंच विजय जगताप आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

आणखी वाचा

error: Content is protected !!