महाडीक कुटुंबीयांच्या दातृत्वातून अखंड जनसेवा : इंदुरीकर महाराज

राहुल महाडीक यांच्या वाढदिवसानिमित्त वाळव्यात कीर्तनाचा कार्यक्रम उत्साहात

वाळवा : आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून महाडीक कुटुंबीयांनी दातृत्वाच्या माध्यमातून जनसेवेचे व्रत अखंडपणे जोपासले आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या हातून समाजसेवेचे कार्य घडत असून, नायकवडी कुटुंबीयांनीही समाजहिताला प्राधान्य देत समाजसेवेची परंपरा कायम ठेवली आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांनी केले.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे संचालक राहुल महाडीक यांच्या वाढदिवसानिमित्त राहुलदादा महाडीक सामाजिक संस्था, वाळवा यांच्या वतीने देवकर हॉल येथे ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे सांगली समन्वयक गौरव नायकवडी होते.


यावेळी राहुल महाडीक, सांगली जिल्हा भाजपचे अध्यक्ष सम्राट महाडीक, हर्षदा महाडीक, जिल्हा परिषद सदस्य पै. संताजी मेटकरी, सतीश महाडीक, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, प्रा. डॉ. महेश जोशी, पोपट अहिर, सरपंच संदेश कांबळे, इसाक वलांडकर आदी उपस्थित होते.

इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनातून आध्यात्मिक विचारांसोबत सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिला. त्यांच्या ओघवत्या शैलीतील कीर्तनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. नायकवडी कुटुंबीयांनीही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांतून समाजहिताला प्राधान्य दिले आहे. नागनाथअण्णा नायकवडी यांनी जोपासलेली समाजसेवेची परंपरा गौरव नायकवडी पुढे नेत असल्याचेही इंदुरीकर महाराज यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे नियोजन राहुलदादा महाडीक सामाजिक संस्थेच्या वतीने रघुनाथ बागडी, डॉ. संतोष वाडकर, रोहित कोले, सारंग कदम, प्रफुल गणेशकर, अभिजीत थोरात, चंद्रकांत गावडे, चंदू डांगे, अमोल कोकाटे, बजरंग गावडे, फिरोज वलांडकर, विनोद ताटे, दादासो लोहार आदींनी केले.

आणखी वाचा

error: Content is protected !!