कराड : ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त, कराड तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटनेने कराड येथील हुतात्मा स्मारकात, आयोजित केलेल्या कार्यक्रमास मान्यवरांनी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार आणि हुतात्मा स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या ग्वालिया टँक मैदानावर (आजचे ऑगस्ट क्रांती मैदान) भारत छोडो आंदोलनाला निर्णायक सुरुवात झाली. महात्मा गांधींनी “करेंगे या मरेंगे” असा निर्धार देशवासीयांसमोर मांडला. ब्रिटिशांनी भारतातून तातडीने निघून जावे आणि भारताला स्वातंत्र्य मिळावे. हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता. आजचा दिवस स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षाची आठवण ठेवण्याचा दिवस आहे, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना आदरपूर्वक अभिवादन
बाळासाहेब पाटील
माजी मंत्री
या ठिकाणी स्मृतीस्तंभास माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, अजितआप्पा पाटील-चिखलीकर, उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांच्यासह गोवा मुक्ती स्वतंत्र लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक बाळकृष्ण कोळेकर, भानुदास पाटील तसेच मान्यवरांनी स्मृतीस्तंभास अभिवादन केले.










