नेपाळच्या अधिकाऱ्यांची यशदाला भेट

पुणे : नेपाळ येथील Counsellor तसेच National Institute of Rural Development (NIRD) मधील अधिकाऱ्यांनी यशवंतराव चव्हाण विकास व प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे भेट दिली. यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचीही उपस्थिती होत

या भेटीदरम्यान भारतातील कृषी क्षेत्र, कृषी व्यवसाय, विविध पिकांचे उत्पादन व व्यवस्थापन, फळबाग लागवड, कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन, तसेच आयात-निर्यात प्रक्रिया आणि बाजारपेठ व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भारतातील कृषी क्षेत्रात राबविण्यात येणारे विविध उपक्रम, उपलब्ध संधी तसेच कृषी उत्पादनांच्या बाजारपेठेशी संबंधित बाबींची माहिती नेपाळमधील अधिकाऱ्यांनी जाणून घेतली.

प्रतिनिधी मंडळाने यशदाच्या परिसराची पाहणी करून प्रबोधिनीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण, क्षमता बांधणी आणि प्रशासकीय विकासविषयक उपक्रमांची माहिती घेतली. यशदाच्या माध्यमातून प्रशासन, ग्रामीण विकास आणि विविध क्षेत्रांमध्ये करण्यात येणाऱ्या प्रशिक्षण व क्षमता विकासाच्या कार्याबाबतही अधिकाऱ्यांनी जाणून घेतले.भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांमधील ज्ञान, अनुभव आणि प्रशासकीय कार्यपद्धतींच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली.

आणखी वाचा

error: Content is protected !!