ईश्वरपुरात तिरंग्याच्या साक्षीने देशभक्तीचा जागर

माजी सैनिकांचा विशेष सन्मान

ईश्वरपूर: भारतीय जनता पार्टी सांगली ग्रामीणच्या वतीने तसेच पेठ मंडल, ईश्वरपूर मंडल, वाळवा ग्रामीण मंडल, व आष्टा मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने उरूण ईश्वरपूर येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. पंचायत समिती येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला उत्साहात सुरुवात झाली. हातात तिरंगा घेऊन भारतमातेचा जयघोष करत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

रॅलीदरम्यान तहसीलदार चौकातील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसरात देशभक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

देशसेवेसाठी आयुष्याचा अमूल्य काळ समर्पित करणाऱ्या माजी सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. देशाच्या रक्षणासाठी त्यांनी केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या त्यागाला मानाचा मुजरा करण्यात आला. हर घर तिरंगा, हर मन तिरंगा या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीने राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रभक्ती आणि देशप्रेमाचा संदेश दिला.

यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे,सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक चिमणभाऊ डांगे, माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे , भाजप नेते विक्रम भाऊ पाटील, पेठ मंडल अध्यक्ष डॉ. सचिन पाटील, ईश्वरपूर मंडल अध्यक्ष संदीपराज पवार, वाळवा ग्रामीण मंडल अध्यक्ष अर्जुन साळुंखे, आष्टा मंडल अध्यक्ष अमोल पडळकर, तसेच नगरसेवक राजवर्धन पाटील, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, माजी नगरसेवक सतीश महाडिक, माजी जिल्हा परिषद सदस्य निजाम मुलानी,पंचायत समिती सदस्य शुभम पाटील, चेतन शिंदे, सुजित थोरात, जलाल मुल्ला, राहुल कदम, साटपेवाडीचे माजी सरपंच संतोष साटपे, लवाजी देशमुख,सोमनाथ फल्ले, सत्यवान रासकर, सागर जाधव, अमोल वीरकर, अभिजीत रासकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी सैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी वाचा

error: Content is protected !!