नवउद्योजक, व्यावसायिक, शेतकऱ्यांना मार्गदर्शन
सांगली १४ : मराठा समाज (सांगली) संस्थेतर्फे शनिवारी १५ ऑगस्ट रोजी ‘मराठा समाज उद्योजक मेळावा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती अध्यक्ष डॉ. मोहन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. मराठा समाज कार्यालयात दुपारी दोन वाजता मेळावा होणार आहे.
माजी मंत्री, आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. खासदार विशाल पाटील अध्यक्षस्थानी आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (नवी दिल्ली) चे सुबीर पॉल हे ‘वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट इन मॅन्युफॅक्चरिंग’वर मार्गदर्शन करणार आहेत. सह्याद्री फार्म्स (नाशिक) चे संस्थापक अध्यक्ष विलास शिंदे हे ‘उद्योजक दृष्टिकोन, उद्योजक समस्या आणि निवारण’वर मार्गदर्शन करतील.
‘मराठा समाजातील उद्योजक, नवउद्योजक तरुण, व्यावसायिक, तसेच शेतकऱ्यांना व्यवसायवृद्धी, आर्थिक नियोजन व उद्योगातील अडचणींवर मार्गदर्शन मिळणार आहे. परिसरातील इच्छुकांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन डॉ. मोहन पाटील, सरचिटणीस जयवंत सावंत यांनी केले आहे.










