महाराष्ट्राचा मानस धामणे भारतीय टेनिस संघात

डेव्हिस कप लढतीत मिळाली संधी

मुंबई : महाराष्ट्राचा १८ वर्षीय टेनिसपटू मानस धामणे याची भारतीय टेनिस संघामध्ये पहिल्यांदाच निवड करण्यात आली आहे. डेव्हिस टेनिस करंडकातील दुसऱ्या पात्रता फेरीतील दक्षिण कोरियाविरुद्धच्या लढतीसाठी (१८ व १९ सप्टेंबर) भारतीय संघाची निवड करण्यात आली. यामध्ये मानस धामणे याला संधी देण्यात आली आहे.

जागतिक क्रमवारीत ३६२ व्या स्थानावर असलेला आणि भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा एकेरीतील खेळाडू मानस धामणे बऱ्याच काळापासून वरिष्ठ संघातील स्थानासाठी प्रयत्न करत होता. आता तो भारताच्या एकेरी संघात अनुभवी सुमीत नागल आणि बंगळूरमध्ये झालेल्या मागील लढतीचा हीरो ठरलेला दक्षिणेश्वर सुरेश यांच्यासोबत असणार आहे.

युकी भांब्री आणि एन. श्रीराम बालाजी ही भारताची दुहेरीची जोडी असेल. सिद्धार्थ रावत आणि युवा खेळाडू अर्णव पापरकर यांची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे. अर्णव ज्युनियर ग्रैंडस्लॅम स्पर्धांमध्ये खेळत आहे.

आणखी वाचा

error: Content is protected !!