केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते गुलटेकडी शाखेचे उद्घाटन
पुणे : सहकाराच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणाला बळ देत ग्राहक व सभासदांचा विश्वास संपादन केलेल्या वनश्री नानासाहेब महाडीक मल्टीस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ईश्वरपूर या संस्थेने पुणे शहरात दमदार पाऊल ठेवले आहे. गुलटेकडी येथे संस्थेच्या नवीन शाखेचा शुभारंभ सहकार आणि नागरी हवाई वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
ग्रामीण भागातून सुरू झालेल्या संस्थेने विश्वास, पारदर्शकता आणि सेवाभावाच्या माध्यमातून आर्थिक सेवा क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल केली आहे. पुण्यासारख्या महत्त्वाच्या व वेगाने विकसित होणाऱ्या शहरात शाखा सुरू होणे ही संस्थेच्या प्रगतीतील महत्त्वाची पायरी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.

यावेळी राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार महेश लांडगे, मल्टीस्टेट फेडरेशनचे चेअरमन सुरेश वाबळे, संस्थापक राहुल महाडीक, सांगली जिल्हा भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोहोळ म्हणाले, महाडीक परिवाराने सामाजिक, शैक्षणिक तसेच सहकार क्षेत्रात केलेले कार्य कौतुकास्पद आहे. ग्राहकांच्या गरजा ओळखून विश्वास, पारदर्शकता आणि सेवाभाव या त्रिसूत्रीवर संस्थेने केलेली वाटचाल उल्लेखनीय असून, सहकार क्षेत्रातील महाडीक परिवाराची वाटचाल आदर्शवत आहे.
पुणे शहर हे उद्योग, व्यवसाय, शिक्षण, रोजगार आणि आर्थिक व्यवहारांचे प्रमुख केंद्र आहे. या पार्श्वभूमीवर गुलटेकडी येथे सुरू झालेली शाखा सभासद, ग्राहक, उद्योजक, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना अधिक सुलभ आणि सक्षम आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. या शाखेमुळे पुणे व परिसरातील नागरिकांना संस्थेशी जोडले जाण्याची तसेच सहकाराच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधण्याची नवी संधी मिळेल, असेही मोहोळ यांनी सांगितले.
विश्वासाची वाटचाल आता पुण्यातही…!
ईश्वरपूर येथील वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या पुणे शाखेचे उद्घाटन केले. सहकाराच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणाला बळ देत ग्राहक व सभासदांच्या विश्वासावर उभी राहिलेली ही संस्था आता पुण्यातही आपल्या सेवांचा विस्तार करत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे.
पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरात संस्थेने सुरू केलेली ही नवी शाखा सभासद, ग्राहक, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना अधिक सक्षम आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास आहे. सहकाराच्या माध्यमातून विश्वास, पारदर्शकता आणि प्रगतीची ही वाटचाल अशीच निरंतर सुरू राहो, यासाठी संस्थेला मनःपूर्वक शुभेच्छा!
सहकार आणि नागरी हवाई वाहतूक
केंद्रीय राज्यमंत्री
मुरलीधर मोहोळ
संस्थापक राहुल महाडीक म्हणाले, ग्राहक आणि सभासदांनी दाखविलेला विश्वास हीच आमच्या संस्थेची खरी ताकद आहे. ईश्वरपूरपासून सुरू झालेली संस्थेची वाटचाल आज पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरापर्यंत पोहोचली, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. पुणे शाखेच्या माध्यमातून ग्राहकांना विश्वासार्ह, पारदर्शक आणि तत्पर आर्थिक सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, उद्योजक आणि व्यापारी वर्गाच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
सम्राट महाडीक म्हणाले, महाडीक परिवाराने सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात नेहमीच विश्वास व सेवेला प्राधान्य दिले आहे. ग्राहकांच्या विश्वासामुळे संस्थेने अल्पावधीत मोठी प्रगती केली असून, पुणे शाखेमुळे संस्थेच्या विस्ताराला नवी दिशा मिळणार आहे. पुणे व परिसरातील नागरिकांना उत्तम आर्थिक सेवा देत संस्थेवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी पदाधिकारी व कर्मचारी कटिबद्ध आहेत.
यावेळी संस्थेचे चेअरमन सतीश महाडीक, व्हाईस चेअरमन प्रदीप पाटील, व्यवस्थापक आर. एम. बागडी, कपिल ओसवाल, जयकर कदम, स्वरूपराव पाटील, प्रसाद पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सभासद, कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते.
पुणे शाखेच्या माध्यमातून संस्थेच्या सेवा अधिक व्यापक पातळीवर पोहोचणार असून, ग्राहकांचा विश्वास हीच संस्थेची खरी ताकद असल्याचे अधोरेखित करत सहकाराच्या माध्यमातून विश्वास, पारदर्शकता आणि प्रगतीची वाटचाल अधिक गतिमान करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
महाडीक परिवाराची सहकार क्षेत्रात विश्वासाची भक्कम पायाभरणी
* ग्राहक व सभासदांच्या विश्वासाला सर्वोच्च प्राधान्य
* पुणे शहरात संस्थेच्या सेवांचा विस्तार
* सहकारातून आर्थिक सक्षमीकरणाला चालना
* पारदर्शक व ग्राहककेंद्री कार्यपद्धतीवर भर
* उद्योजक, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक सेवांची उपलब्धता
* महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात विस्ताराची नवी दिशा










