शिये : डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे येथील कृषिकन्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२६ अंतर्गत शिये गावामध्ये वृक्षलागवड व रोपांच्या संगोपनाबाबत शेतकरी व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी कृषिकन्यांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून रोपांची योग्य निवड, लागवडीची पद्धत, खड्डा तयार करणे, रोपांची लागवड तसेच लागवडीनंतर घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली.
कृषिकन्यांनी ग्रामस्थांच्या सहभागातून वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तसेच झाडांचे महत्त्व, माती व पाणी संवर्धन आणि परिसर हिरवागार ठेवण्यासाठी वृक्षलागवडीची गरज याबाबत जनजागृती केली.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. शेलार, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एम. घोलपे, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. आर. पाटील तसेच विषयतज्ज्ञ डॉ .एस.आर.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
या प्रात्यक्षिकाचे नियोजन व आयोजन कृषिकन्या गायत्री कोष्टी, हर्षल कानसे, श्रेया खोत, साक्षी कुंभार आणि तनया पाटील यांनी केले. कार्यक्रमास शेतकरी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.










