नागरी पतसंस्था गटात द्वितीय क्रमांक
ईश्वरपूर : ईश्वरपूर येथील व्यंकटेश्वरा अर्बन सोसायटीला सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल नागरी पतसंस्था गटात द्वितीय क्रमांकाचा सहकार तपस्वी गुलाबराव पाटील पुरस्कार प्राप्त झाला. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सहकार तपस्वी गुलाबराव पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात संस्थेचे चेअरमन रघुनाथ बागडी यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी संस्थेला रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
संस्थेचे पारदर्शक कामकाज, सभासदांचा दृढ विश्वास, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या दर्जेदार सेवा तसेच संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाच्या सातत्यपूर्ण परिश्रमांची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान संस्थेच्या कार्याची आणि सभासदांच्या विश्वासाची पावती असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्यास सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, उपाध्यक्षा जयश्री पाटील, आमदार सत्यजित देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक व संस्थेचे संस्थापक राहुल महाडीक, मन्सूर खतीब, अनिता सगरे, वैभव शिंदे, मनोज शिंदे, बाळासाहेब होनमोरे, माजी अध्यक्ष दिलीप वग्याणी, सरकारी वकील ॲड. प्रमोद भोकरे, विजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ आदी उपस्थित होते.
या यशाबद्दल व्यंकटेश्वरा अर्बन सोसायटीच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक, कर्मचारी व सभासदांचे अभिनंदन करण्यात आले.










